NC Times

NC Times

साधना कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर(जालिंदर शिंदे):- पुरोगामी विचारसरणींच्या खंद्या समर्थक व कवठेमहांकाळच्या पहिल्या नगराध्यक्षा सौ साधना सिध्दार्थ कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तश्या आशयाचे पत्रही प्रदेशाअध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत आमदार श्रीमती सुमनताई पाटील व जिल्हा अध्यक्षा सुश्मिता जाधव यांच्या संयुक्त हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
सौ साधना कांबळे या कुशल संघटक व स्पष्ट वक्त्येपणासाठी सर्वत्र परिचित आहेत.या जोरावरच त्यांनी कवठेमहांकाळच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला आहे.यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले की साधनाताई कांबळे यांच्या कुशल संघटन कौशल्याचा पक्ष वाढीसाठी नक्कीच फायदा होईल.त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा तर पक्षाने दाखविलेल्या विश्वासाच पात्र राहुनच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सौ साधना कांबळे यांनी सांगितले.
       यावेळी आमदार सुमनताई पाटील,जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील,महीला आघाडीच्या सुश्मिता जाधव,जिल्हा बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील,ताजुद्दीन तांबोळीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.