NC Times

NC Times

आटपाडी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार आरोपीला जामीन मिळाल्यावर चौकात आणुन दुलाई करणार-मा.आमदार राजेंद्र अण्णा देशमुख


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आरोपीला जामीन मिळाल्यावर घरातून ओढून चौकात आणून मारू माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आटपाडीमध्ये शाळकरी अल्पवयीन मुली वरती संग्राम देशमुख नावाच्या युवकांनी जबरदस्ती बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेमध्ये संग्राम देशमुख याला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे परंतु या आरोपींनी अशा पद्धतीचे अनेक गुन्हे केले असल्याची शहरांमध्ये मागील काही दिवसापासून मोठी चर्चा होती. अद्याप संग्राम देशमुख यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं परंतु नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे आटपाडी शहरातील सर्व नागरिकांनी मिळून शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी आटपाडी बंदची हाक दिली होती सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यापार नागरिकांतून उत्स्फूर्तपणे बंद ठेवला होता.
नागरिकांनी आटपाडीच्या बस स्थानकापासून मुख्य पेटीतून आटपाडी पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला व या मोर्चामध्ये आरोपी संग्राम देशमुख यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली या मोर्चाला आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ब्रह्मानंद पडळकर भारत पाटील राजेंद्र खरात अरुण वाघमारे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.