NC Times

NC Times

आटपाडी येथील कोळेकर मळ्यात घरातील व्यक्तीच्या अंगावर गुंगीचे स्प्रे मारुन सोने- चांदी रोख रक्कमेवर चोराचा डल्ला


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी (राजु शेख)-

आटपाडीच्या कोळेकर मळ्यात मोठी चोरी घरातील व्यक्तींच्या अंगावर गुंगीचा स्प्रे मारून सोने-चांदी व रोख रक्कम लंपास आटपाडी शहराच्या पूर्वेला असलेल्या पांढरेवाडी जवळ कोळेकर मळा येथे सोमवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान आज्ञा चोरट्यांनी मोहन निवृत्ती कोळेकर यांच्या घरामध्ये झोपलेल्या माणसांच्या अंगावर व जनावरांच्या अंगावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे करून चोरी केल्याची घटना आज उघड झाली आहे रात्री कोळेकर यांच्या घरातील सर्व सदस्य झोपले असता अज्ञात चोरट्यांनी गुंगीच्या औषधाचा स्प्रे करून घरातील कपाटातील सोने साधारणपणे पाच तोळे व चांदी रोख रक्कम 50 हजार रुपये असा आहे व सोडून याला आहे विशेष म्हणजे गुंगीच्या औषधाचा स्प्रे केल्याने घरातील झोपलेल्या महिलेच्या अंगावर असलेले दागिने व पायातील जोडवी सुद्धा काढून नेले आहेत रात्री दीड वाजता गुंगीचा असर कमी झाल्यानंतर घरामध्ये पाहिले असता घरात चोरी झाल्याचे उघड झाले आहे याबाबत आटपाडी पोलिसांना सूचना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जागेवर पंचनामा केला आहे याबाबत आटपाडी पोलीस आणखी तपास करीत आहेत