NC Times

NC Times

मतदार यादीत नावे असल्याची खात्री करावी- तहसीलदार अर्चना कापसे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २८७- तासगांव-विधानसभा मतदारसंघा मध्ये दिनांक १ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर विशेष मोहीम राबविण्यात आली होती.सदर मोहीमेमध्ये नवीन मतदार नोंदणी,मयत मतदार व स्थलांतरित तसेच गैरहजर मतदार वगळणे हा कार्यक्रम ६ ऑगस्ट २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या दरम्याने राबविण्यात आला होता.त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्याची अंतीम मतदार यादी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तरी तासगांव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदार संघातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मतदारांनी सदर मतदार यादीमध्ये आपआपली नावे समाविष्ट आहेत का व ती बरोबर आहेत का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २८७ तासगांव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार कवठेमहांकाळ अर्चना कापसे यांनी केले आहे.