NC Times

NC Times

आई-वडील हेच सर्वात मोठे देव-हभप अनिल दुबुले-महाराज


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- आई-वडील हेच आपणा सर्वांसाठी सगळ्यात मोठे देव असुन त्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असे मत झी टीव्ही फेम हभप अनिल दुबुले-महाराज (तडवळेकर) यांनी केले.ते तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथे माजी सरपंच स्व जगन्नाथ पांडुरंग जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने घेण्यात आलेल्या किर्तन सेवेत बोलत होते.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी बोलताना हभप अनिल दुबुले-महाराज पुढे म्हणाले की जगात कोणालाही तुम्ही त्यांच्या पेक्षा मोठे व्हावे असे वाटत नाही,पण हे एकमेव तुमच्या आईवडीलांनाच वाटते की आपल्या मुलांनी आपल्या पेक्षा मोठे व्हावे ही वस्तुस्थिती आहे.कारण आई ही प्रेम असुन वडील हे आधार आहेत.
      प्रारंभी विणा व प्रतिमा पूजन करुन,किर्तन सेवा पार पडली.तदनंतर आरती व पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास मृदंग साथ ही हभप केशव कुंभार-महाराज (यतगांव) यांनी तर गायन साथ हभप केशव रुपनर-महाराज (निमज) यांनी केली तर किर्तन साथ ही तिसंगी, घाटनांद्रे,वाघोली,गर्जेवाडी,डोंगरसोनी,दहीवडी व जरंडी येथील भजनी मंडळांनी केली.
         स्वागत संपतराव जाधव यांनी तर आभार सुयोग जाधव यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन संपतराव जाधव,सौ संगीता जाधव,सुयोग जाधव,प्रविण जाधव,कु स्नेहल जाधव व कुटुंबीयांनी केले.