NC Times

NC Times

कुंडलापुरात श्रीचे पारंपरिक पध्दतीने विसर्जन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-कुंडलापुर (ता कवठेमहांकाळ) येथील सार्वजनिक श्री गणेश मित्र मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणुक ही अनंतचतुर्दशी दिवसी पारंपरिक पध्दतीने टाळ मृदुंगाच्या गजरात व बैलगाडीतून काढण्यात आली.या वर्षी मंडळाचे हे २१ वे वर्ष आहे.यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मंडळाच्या वतीने गणेश उत्सवा दरम्याने विविध प्रकारच्या धार्मिक,स्पर्धात्मक कार्यक्रमासह महाप्रसादाचेही आयोजनही करण्यात आले होते.यामध्ये संगितखुर्ची,रांगोळी स्पर्धा,भजन, किर्तन याचा समावेश होता.मंडळाच्या वतीने आकर्षक, मनमोहक व सिंहासनारूढ अशी श्रींची मूर्ती बसवली होती.ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.यावेळी मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.