NC Times

NC Times

तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एस. एम बाथा हायस्कूलला घवघवीत यश मुलांमध्ये कु. रोहन संजय चोरगे ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू'


नवचैतन्य टाईम्स  महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका स्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शैक्षणिक केंद्र असलेल्या पाचगणी या ठिकाणी करण्यात    आले होते.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील स्वीट मेमरीज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील १४ शाळांमधील विविध वयोगटातील मुलांचे ३० व मुलींचे १४ असे मिळून एकूण ४४ संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. पैकी स्वीट मेमरीज हायस्कूल व एस एम बाथा हायस्कूल पाचगणी यांनी सर्व वयोगटात मिळून प्रत्येकी तीन विजय संपादन केले असून एस. एम बाथा हायस्कूलचा कु. रोहन संजय चोरगे याने मुलांच्या १७ वर्षे वयोगटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा तर १४ वर्षे वयोगटात कुमारी तनिष्का रांजणे हिने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. पहिल्या क्रमांकाचे विजयी संघ हे येत्या १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सातारा जिल्हा हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विजयी संघः १४ वर्षे वयोगट (मुली) प्रथम एस. एम बाथा हायस्कूल पाचगणी, द्वितीय गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल. १४ वर्षे (मुले) प्रथम स्वीट मेमरीज हायस्कूल, द्वितीय व्हिज्डम हायस्कूल. १७ वर्षे (मुले) प्रथम एस. एम बाथा हायस्कूल द्वितीय बिल्ली मोरया हायस्कूल. १७ वर्षे (मुली) प्रथम सेंट झेवियर्स हायस्कूल, द्वितीय एस. एम बाथा हायस्कूल. १९ वर्षे (मुली) प्रथम स्वीट मेमरीज हायस्कूल, द्वितीय नॅशनल पब्लिक स्कूल. १९ वर्षे (मुले) प्रथम सेंट झेवियर्स हायस्कूल, द्वितीय स्वीट मेमोरीज हायस्कूल. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक श्री संजय पिसाळ सर श्री उमेश भोसले सर श्री अनिल वने सर व सहभागी सर्व शाळांमधील क्रीडा प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले...