NC Times

NC Times

पिंपरी चिंचवड मध्ये कलाकारांच्या हितासाठी कलाकारांची बैठक संपन्न


नवचैतन्य टाईम्स पुणे(अर्पिता शिवणेकर)- रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथील शिवाजी पार्क संभाजी नगर मधील हर्षधन विला मध्ये कलाकांराची बैठक पार पडली. 
या मेळाव्यामध्ये कलाकारांच्या हिताचे मुद्दे, महिला कलाकारांच्या सुरक्षिततेचे आणि त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर चर्चा सविस्तर चर्चा करण्यात आली.
कलाकारांच्या जीवनातील प्रश्न आणि त्यांच्या जिवनयापन प्रश्न या सारख्या गहन मुद्यावरही चर्चा झाली आणि येथून सर्व कलाकारांना आपले कला संबधीत अडचणी सोडवण्यासाठी एकत्रित येण्याची नितांत गरज आहे
  या बैठकीचा उद्देश सर्व कलाकारांना एकत्र येवून आपले प्रश्न सोडवणे आणि कलाकारांना योग्य तो हक्क मिळावा यासाठी लढा उभा करावयाचा होता.
लवकरच कलाकारने कलाकारांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ सुरु करणार असून त्या व्यासपीठामधून कलाकारांचे अनेक प्रश्न सोडविल्या जाणार आहेत.व विविध योजना राबविल्या जाणार असून कलाकारांना काम व कामाचा योग्य मोबदला देण्याचं काम हे व्यासपीठ करणार आहे अशी माहिती मंगेश सिरसाट, बलराम पवार यांनी यावेळी दिले.तसेच कलाकारांना योग्य मानधन कामाचे तास व सिरीयल चे 3 महिन्याने मिळणार मानधन या वर सुद्धा चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीमध्ये मान्यवर कलाकार मंगेश शिरसाठ, बलराम पवार, सचिन राठोड, अपूर्व बागुल, किरण गायकवाड, प्रकाश इंगवले , जितेंद्र नलावडे, गजानन कांबळे, महेंद्र भांगे तसेच मान्यवर महिला कलाकार अर्पिता खंडू शिवणेकर , सारिका शिवणेकर आदी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या प्रश्नावर हितगुज साधला.सदर बैठकीचे सांगता करुन पुढील मेळाव्याचे तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.