NC Times

NC Times

बँक ऑफ इंडिया माडग्याळ शाखेतर्फे ग्राहक जनजागृती मोहीम कार्यक्रम संपन्न


नवचैतन्य टाईम्स जत तालुका प्रतिनिधी(विजय चौगुले)-
माडग्याळ येथे शुक्रवार दिनांक 13 रोजी बँक ऑफ इंडिया माडग्याळ शाखेतर्फे ग्राहक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी बोलताना शाखाधिकारी  मौलाली नदाफ म्हणाले की कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लाच देऊ नका व लाच घेण्यास त्यांना प्रवृत्त करू नका, आपल्या हक्कासाठी लाच कशाला द्यायची, लाच देणे व लाच घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे,
सर्वसामान्य नागरिकांनी वेळीच जागे व्हा, भ्रष्टाचार थांबवा, लोकशाही वाचवा ,देश वाचवा नाहीतर आपल्याच गावात आपल्या शहरात आपल्याच राज्यात गुलाम बनून जगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र यांच्या टोल फ्री १०६४-९९३०९९७७०० या नंबर वर तक्रार करा .
या कार्यक्रम प्रसंगी जत पं. समिती माजी उपसभापती तम्मा चव्हाण, ग्रा.पं. सदस्य महादेव माळी, अरविंद कोरे, भिमाण्णा माळी, बॅक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .