NC Times

NC Times

घाटमाथ्यावर गौरी-गणपतीच्या सणाने राती जागल्या तर सजावटी द्वारे समाज प्रबोधनही




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे):- सध्या घाटमाथ्यावर गौरी गणपतीच्या सणाची सर्वत्रच धामधूम सुरू आहे.या सणा निमिताच्या आकर्षक सजावटी द्वारे अनेक सामाजिक,स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहे.घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापूर,जाखापुर व कुची परीसरात गौरी-गणपतीच्या सणामुळे अनेक ठिकाणी आकर्षक सजावटी केल्या आहेत.ते पहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.तर गणपती उत्सवामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा,सायकल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,पाककला यांसारख्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.तर अनेक ठिकाणी भजन,कीर्तन व व्याख्याने होत आहेत.तर बर्याच ठिकाणी महाप्रसादाचीही‌ रेलचेल सुरु आहे.
       तर श्री गणेशाच्या आगमनानंतर अगदी तिसऱ्याच दिवशी गौरीचे आगमन होते.गौरीच्या मुखवट्याना अगदी उभेउभ स्त्रीचे रूप देवून तिला आकर्षक साजशृंगार केला जातो.गौरीच्या आलेल्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य तर दुसर्या दिवशी पुरणपोळीसह गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो.गणपती बसलेल्या पाचव्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते.गौरीच्या सणा दरम्याने स्त्रिया स्वतः साजशृंगार करून एकमेकींच्या घरी जाऊन सौभाग्याचे प्रतिक समजले जाणारे वाण देतात व रात्री पारंपरिक झीमा फुगडी,काटवट तवा,सुप नाचवणे,लंगडी या सारखे खेळ खेळतात.
      गौरी व गणपतीची सजावट करताना अनेक ऐतिहासिक,पौराणीक,सामाजिक देखावेही उभे केले होते.घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील डॉ शरद चव्हाण यांच्या घरी महीलांनी केलेली गौरीची सजावट ही अगदी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.त्यामध्ये ऐतिहासिक, पौराणीक व धार्मिक अशी एकत्रित जोड देऊन गौरी-गणपतीचा देखावा उभा केला होता.यावेळी सौ माधुरी चव्हाण,रेखाताई पाटील,पदमीनी पाटील,अक्षरा कणसे,सारीका देसाई,रेखा गुरव,शितल देसाई यांनी या सजावटीमध्ये रंग भरुन एकमेकींना वाण देवून विविध प्रकारचे महीलांचे पारंपरिक खेळ सादर केले.यावेळी महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.