NC Times

NC Times

अष्टविनायक सांस्कृतिक व क्रिडा मंडळ सातारा यांच्या वतीने शिशु विकास कार्डचे मार्गदर्शन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)-
अष्टविनायक सांस्कृतिक व क्रिडा मंडळ. देशमुख काॅलनी, सातारा.येथील गणेशोत्सव मंडळाचा एक नावलौकिक आहे..राष्ट्र सेवादल कार्यात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती .सौ.जयश्रीताई माजगावकर यांचे ,शिशु विकास कार्ड  मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला.श्री. अजित शिंगटे.यांनी प्रास्ताविक केले ..बचत गटातील महिला..सदस्यांची सन्मान करण्यात आला..शिशु विकास योजनेंतर्गत सहभाग घेऊन नोंद करून घेण्याबद्दल आवश्यक माहिती दिली ,मुलांची सुरक्षा यावर अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.गुड टच बॅड टच, आईवडील महत्त्व, विकास व शिक्षण समज यावर विचार मांडले .आभार शिंगटे यांनी मानले. या उपक्रमामुळे या गणेशोत्सव मंडळा बद्दल नागरिकांकडून सकारात्मक समाधान व्यक्त करण्यात आले आहे. गणेशोत्सवामध्ये अशा उपक्रमामुळेच 
या मंडळाकडून सामाजिक प्रबोधनाचे कार्य नक्कीच संपन्न होत आहे. पुढील काळातही या मंडळाकडून असेच उपक्रम राबवले जावे हीच सदिच्छा सर्व नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.

कविराज अमोल मांढरे.वाई. जिल्हा                  Mobile no.7709246740