NC Times

NC Times

घाटनांद्रे परिसरातील गणेश मंडळांना आमदार सुमनताई पाटील यांच्या भेटी व आरती


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) परिसरातील गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाची आरती केली.यावेळी भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       घाटनांद्रे येथील शिवतीर्थ गणेश मंडळ,भैरवनाथ गणेश मंडळ,गणेश कला क्रीडा गणेश मंडळ व श्रीमंत योगी गणेश मंडळ कोंडार रस्ता येथील गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांनी आरती केली.यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी हितगुजही साधले.
       यावेळी सरपंच अमर शिंदे, उपसरपंच सुनील कांबळे, तंटामुक्तचे कुलदीप शिंदे,पोलिस पाटील एकनाथ शिंदे,माजी उपसरपंच सुरेश पाटील,जिप शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष पाटीलसह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.