NC Times

NC Times

जत येथील तनवीर मित्र मंडळाच्या वतीने पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स जत(नजीरभाई चट्टरकी)-जत येथील तनवीर मित्र मंडळाच्या वतीने साला बादाप्रमाणे यंदाही पैगंबर जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..इस्लामचे धर्म संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी च्या रूपाने जगभरात साजरा करण्यात येते..इस्लाम धर्माच्या रूढी व परंपरा मुस्लिम समाजामध्ये घट्ट रुजवण्याच्या दृष्टीने पवित्र कुरान व हदीस मधील तत्वांचे काटेकोर पणाने पालन करण्यात यावे या उदात्त भावनेने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिनाच्या स्मरणार्थ पैगंबर जयंती सर्वत्र साजरी करण्यात येते याच अनुषंगाने सांगली जिल्ह्याच्या जत शहरांमध्ये मुस्लिम समाजातील धडाडीचे युवा नेते तनवीर मित्र मंडळाचे संस्थापक महबूब गवंडी व तसेच मंडळाचे अध्यक्ष अशफाक हुजरे यांच्या पुढाकाराने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या महबूब सुभानी दर्गा आवारात पैगंबर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार, सांगली मार्केट कमिटी चे संचालक स्वप्निल भैया शिंदे, हाजी बांदेनवाज पटाईत, हाजी रशीदभाई पटाईत, शाही मस्जिद मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मकसूदभाई नगारजी, राजू भाई इनामदार,मच्छिंद्र वाघमोडे उपस्थित होते सर्वप्रथम माननीय सुरेश शिंदे सरकार यांनी हजरत बाबू सुभानी यांच्या माजार चे दर्शन घेऊन अभिवादन केले.
मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या स्पर्धांमधील विजेत्या मुलांचे सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. पैगंबर जयंती मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या भाविकांसाठी अन्नदानाच्या रूपाने भोजन व्यवस्था करण्यात आली यावेळी महिलांच्यासाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती
तनवीर मित्र मंडळाचे कादिर हुजरे, सलीम मुल्ला सैफुल्ला चांद इम्तियाज महात,असलम हुजरे,इम्रान गवंडी, हाजी पापा हुजरे, रियाज शेख, डॉक्टर लालू हैदराबादे आदींनी परिश्रम घेतले.. शेवटी उपस्थित त्यांच्या आभार डॉक्टर शफिक इनामदार यांनी मानले