NC Times

NC Times

तम्मनगौडा रवीपाटील यांनी पदयात्रा काढून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या वतीने जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवीपाटील यांनी जनकल्याण संवाद पदयात्रा काढून जत तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
पदयात्रेचा तिसरा व अंतिम टप्पा ३१ ऑगस्ट रोजी उटगी येथे संपन्न झाला २७ जुलै रोजी जनकल्याण संवाद पदयात्रेची सुरुवात उमदी येथून  करून हळळी, बालगाव, बोर्गी, मोरबगी, जाल्याळ बुद्रुक, तिकुंडी, संख, दरीबडची, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, मेंढेगिरी, खोजनवाडी, उमराणी, सिंदूर, बसर्गी, बिळूर, येळदरी, जत शहर,खलाटी, जिरग्याळ, मिरवाड, डफळापूर, बेळंकी, बाज, अंकले, डोरली, हिवरे, कुंभारी, कोसारी, कासलिंगवाडी, वाळेखिंडी, शेगाव बनाळी निगडी खुर्द, काराजनगी, कोळगिरी, सोरडी, गुड्डापूर, व्हस्पेठ, माडग्याळ, सोन्याळ व उटगी या गावांचा समावेश होता.
 शेगाव येथून पदयात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली या पदयात्रेमध्ये  प्रत्येक गावामध्ये विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. प्रत्येक गावामध्ये ५०० हून अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला व रवी पाटील यांना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी  आशीर्वाद दिले. उटगी येथील समारोप सभेच्या ठिकाणी २००० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. या पदयात्रेमध्ये जनतेचे व खास करून महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न रवी पाटील यांनी केला. पदयात्रा समितीचे अध्यक्ष  निवृत्ती शिंदे, संयोजक बसवराज पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांनीही त्यांचे विचार मांडले. रवी पाटील यांनी  भाजप सरकारच्या  योजनांची माहिती सर्वांना दिली व कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी जत येथील भाजपाचे अधिकृत कार्यालय भाजपा वॉर रूमशी संपर्क करण्याचे आवाहन सर्वांना केले. पदयात्रेमध्ये प्रत्येक गावातील माता भगिनींनी व ग्रामस्थांनी रवी पाटील यांच्या पाठीशी राहण्याची हमी दिली. या जनकल्याण संवाद  माजी केंद्रीय मंत्री तथा विजयपूरचे आमदार बसणगौडा पाटील-यतनाळ, माजी आमदार विलासराव जगताप, ज्येष्ठ नेते आर के पाटील सर, राष्ट्रवादीचे नेते अमोल डफळे, प्रकाश जमदाडे, सरदार पाटील, युवराज निकम, दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण, शंकर वगरे, आशिष शिंदे, लक्ष्मण बोराडे, सचिन बोराडे, सचिन निकम, बाळासाहेब पाटील, प्रकाश इंगवले, संतोष पाटील, महांतेश पाटील, यांनी पाठिंबा दर्शविला. 
त्याचप्रमाणे ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी उमदी गावचे नेते माजी सरपंच निवृत्ती शिंदे, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके,  भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विजय पाटील, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस कामन्ना बंडगर, किसान मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष रावतराय तेली, भारतीय जनता पार्टी सहकार सेलचे जिल्हा सह संयोजक कुमार अण्णा जैन, भाजपा भटक्या विमुक्त जाती सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे, आरपीआयचे नेते सुभाष कांबळे, भाजपा युवा मोर्चा सदस्य चिदानंद संती, सुरेश पाटील, शिवानंद मुचंडी, बिरप्पा नरूटे, प्रदीप जाधव, अतुल गुजले, चिदानंद रवी, विजय बगली, तानाजी पाटील, मिरासाब मुजावर, रामलिंग निवर्गी, अंनेश हेळवी, बसवराज तेली, बसवराज बिरादार, जत विधानसभा प्रभारी रामचंद्र पाटील, भाजपा विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पिरू कोळी, दरेश्वर चौगुले, अशोक बिळूर, नरेंद्र कोळी, संजय गडदे, मारुती माळी, राम माळी, राजू चौगुले, बसवराज यलगार, पांडुरंग भंडे, भागवत शिंदे, दगडू शिंदे, विठ्ठल मसळी, विजयकुमार बिरादार, व सर्वच कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले 
जनकल्याण संवाद पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे अध्यक्ष संयोजक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व माता-भगिनी यांचे आभार तम्मनगौडा रवी पाटील यांनी मानले.
तम्मणगौडा रवीपाटील यांनी काढलेल्या या ऐतिहासिक पदयात्रेत जत तालुक्यातील सुमारे 50 हजार माताभगिनीना साड्या वाटून येणारी विधानसभा निवङणुक लढविण्यासाठी आशीर्वाद घेतले.हिवरे येथील भगिनींनी त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगितले. रवीपाटील यांनी ताबडतोब तो रस्ता स्वखर्चाने करून दिले.कोसारी ग्रामस्थांच्या मागणी वरून तेथील दुर्गामाता मंदिर बांधकामास १ लाख रूपये दिले.शेगाव येथील हनुमान मंदिर बांधकामास ५१ हजार रुपये दिले.