NC Times

NC Times

खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत गुड्डापूर येथे 12 सप्टेंबर रोजी विरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे आयोजन-डॉ. सार्थक हिट्टी


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ/ प्रतिनिधी(विजय चौगुले)-
भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्यसभेचे खासदार तसेच लिंगायत समाजाचे नेते माननीय डॉ. अजित गोपछडे हे गुरुवार दि १२ सप्टेंबर २०२४ रोजी गुड्डापूर येथे सकाळी ठिक १० वाजता त् उपस्थितीत राहणार असून त्यांच्या उपस्थितीत विरशैव लिंगायत सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासोबत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा व लिंगायत समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टी जत तालुका यांच्यावतीने नवनिर्वाचीत लिंगायत समाजाचे खासदार मा. डॅा. अजीत गोपछडे सोा. यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे . तरी जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सकल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे युवा नेते वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.