NC Times

NC Times

शिवनी ता.कडेगाव येथील यल्लाप्पा पवार यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)- 
यल्लाप्पा पवार ( सर) राहणार- शिवनी ,तालुका- कडेगाव, जिल्हा- सांगली वय ७५ वर्षे यांचे दुःखद निधन झालं असुन आपल्या नंदीवाले समाजातील पहिले शिक्षण घेणारे असे ते व्यक्ती होते, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन शिक्षक ते मुख्याध्यापक असा त्यांचा प्रदिर्घ प्रवास झाला, पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 2007 ला सेवानिवृत्त झाले, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमी सहभाग असायचा, त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुलं, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे,
नागज येथील बालाजी फोटो स्टुडिओ चालक व नवचैतन्य टाईम्सचे नागज प्रतिनिधी हणमंत देशमुख यांचे मावस सासरे होत,रक्षाविसर्जन शिवनी येथे रविवार 1-9-2024 रोजी सकाळी ठीक आठ वाजता होणार आहे