NC Times

NC Times

सरदार पाटील, बाळ निकम पदयात्रेत सहभागी तम्मनगौडा रविपाटील यांना दिल्या शुभेच्छा


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)-
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी काढलेल्या जनकल्याण संवाद पदयात्रेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील ,युवा नेते युवराज निकम यांनी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या.
जत तालुक्यामध्ये नवक्रांतीची बीजे रोवणाऱ्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल बिळूर येथे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यतनाळ यांच्या सभेने रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. बिळूर मुक्कामानंतर ही जनकल्याण संवाद पदयात्रा जतकडे मार्गस्थ झाली आहे.
बिळूर ते येळदरी दरम्यान या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, विक्रम फाउंडेशनचे माजी अध्यक्ष, युवा नेते युवराज निकम, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मकरंदभाऊ कुलकर्णी सहभागी झाले. तमनगौडा रवी पाटील यांच्या जनकल्याण पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदयात्रींसोबत काही अंतर चालले.
जनकल्याण संवाद पदयात्रा १६० किलो मीटरचा प्रवास करत आज शनिवारी जत शहरात दाखल होत आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जत शहरात होत आहे. जागोजागी पदयात्रेचे प्रचंड स्वागत होत आहे‌. महिला-भगिनी औक्षण करून तम्मनगौडा रवीपाटील यांना राखी बांधून स्वागत करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील नेते, प्रतिष्ठित व्यक्ती पदयात्रेत सहभागी होत आहेत. शुभेच्छा देत आहेत. यावेळी बसवराज पाटील, हणमंत गडदे, निवृत्ती शिंदे-सरकार, सुनिल पोतदार उपस्थित होते