NC Times

NC Times

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संबंधित अंमलबजावणीसाठी कोरेगाव तालुक्यात आढावा बैठक संपन्न




नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी-(जय मोरे )
महायुती सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे २ महिने हप्त्याचे पैसे रुपये ३०००/ हे महिलांच्या खात्यावर्ती येण्यास सुरुवात झाली आहे.कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील वाठार किरोली सर्कल, रहिमतपूर नगरपालिका व कन्हेरखेड गण, येथील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, व या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणारे सर्व गावचे ग्रामसेवक व इतर यंत्रणा यांची बैठक कोरेगांव तालुक्याचे तहसीलदार सांगमेश कोडे, कोरेगांव तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले साहेब, यांच्या उपस्थितीमध्ये घेतली. यावेळी जिल्हा अध्यक्ष भाजपा यांनी कोणतीही अडचण असल्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू अशी सूचना केली. मा. रामकृष्ण वेताळ साहेब भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांनी महिला सक्षमीकरण साठी असलेल्या सर्व योजना विषयी सांगितले ,
मा. दिपाली ताई खोत यांनी सांगितले, आतापर्यंत 97 लाख 35 हजार महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे . पैसे जमा करण्याची प्रोसेस अविरत चालू आहे. तसेच सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रेरिका यांच्या कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम, रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका पाटील, कराड-उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, किसान मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा रुक्मिणी जाधव, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, मंडळ अधिकारी गीते सर, तलाठी येणारे, पर्यवेक्षिका प्रज्ञा बेंद्रे, पर्यवेक्षिका, दया पवार, पर्यवेक्षिका लता ननावरे,तसेच विविध गावचे ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, अशा सेविका, सी.आर.पी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.