NC Times

NC Times

"जगदंब फाउंडेशन तर्फे सातारा", येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)-  सातारा. "जगदंब फाउंडेशनच्या" वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोक घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांच्या हस्ते संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांना गौरविण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष  दिलीप देशमुख, उपाध्यक्ष नागेश साळुंखे, संस्थापक सदस्य  प्रदीप शिंदे, सहसचिव सुनील शिंदे, व फाउंडेशनचे विश्वस्त आणि शाहूनगर जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना श्री घोरपडे म्हणाले, जगदंब फाउंडेशन चा उपक्रम खरोखर वाखाण्याजोगा आणि सामाजिक हित जपणारा आहे. समाजातील जे विद्यार्थी आहेत,ते उद्याचे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे हीच आपली आजची विद्यार्थी पिढी घडविण्याकरता त्यांचा केलेला गौरव हा त्यांच्यासाठी व समाजासाठी योग्य दिशा देणारा आहे. सध्याची तरुण पिढी योग्य तरीने घडली तरच उद्याचे भक्कम राष्ट्र उभे राहील. श्री लाड म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या काळात सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रोज पहाटे चालणे,योगासने, ध्यान करणे यांसारखी व्यायामाचे प्रकार करून स्वतः आरोग्य संपन्न राहणे ही आजची काळाची गरज आहे. या कार्यक्रमा वेळी पंधरा विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे सदस्य बाबा घोरपडे, चंद्रकांत साळुंखे, सुधाकर शितोळे,मंगेश काशीद, यशवंत साळुंखे, लक्ष्मण धनवडे, रवींद्र शेळके, वकील सचिन तिरोडकर.आदि उपस्थित होते. कार्यक्रमा वेळी सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय घाडगे यांनी आभार मानले.
धन्यवाद. 
कविराज अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा
Mobile no.7709246740