NC Times

NC Times

डॉ. सार्थक हिट्टी यांची गडीनाडू कन्नडीगा वैद्यकीय कमिटीच्या अध्यक्षपदी निवड


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर(विजय चौगुले)-
माडग्याळ तालुका जत येथील  भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय व आयटी सेलचे सांगली जिल्हाअध्यक्ष तसेच दानम्मादेवी देवस्थान  ट्रस्ट गुड्डापूर समितीचे सदस्य डॉ. सार्थक हिट्टी यांची गडीनाडू कन्नडीका वैद्यकीय कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बुधवार दिनांक २८  रोजी गुड्डापूर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री  मा. ना. सिद्धरामय्या व  उपमुख्यमंत्री मा.ना.डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते निवड पत्र देऊन त्यांचा सन्मान होणार आहे .गडीनाडू वैद्यकीय कमिटीच्या अंतर्गत दक्षिण सोलापूर , अक्कलकोट, जत, गडहिंग्लज या तालुक्यातील वैद्यकीय कमिटीच्या व इतर सोयी सुविधांच्या यात समावेश करण्यात आला आहे .डॉ. सार्थक हिट्टी  यांनी  ग्रामीण भागामध्ये  वैद्यकीय सेवा गरजू व गोरगरीब रुग्णांना आजपर्यंत दिलेली आहे त्याचीच पोच पावती म्हणून गडीनाडू वैद्यकीय कमिटीच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली आहे, या पदाचा उपयोग कर्नाटक व महाराष्ट्र  राज्यसीमा अंतर्गत येणाऱ्या सर्व गोरगरीब गरजू रुग्णांची  जास्तीत जास्त वैद्यकीय मदत कशी करता येईल त्याच्याकडे लक्ष देणार आहेत व योग्य ते पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारच्या व कर्नाटक सरकारच्या योजनेचा पुरेपूर उपयोग हा शेवटच्या जनतेपर्यंत कसा पोहोचवता येईल याच्यावर ते जास्त लक्ष देणार आहेत तसेच गडीनाडू कन्नडीका योजनेचा लाभ दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना कशा पद्धतीने देता येईल त्या सर्व प्रकारच्या कामांवर डॉ.  सार्थक हिट्टी लक्ष देणार आहेत असे त्यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले