NC Times

NC Times

पारंपरिक शेती पध्दतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती किफायतशीर - तहसीलदार अर्चना कापसे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- जग हे झपाट्याने बदलत असुन त्यात नवनवीन शोध लागत आहेत.तेव्हा बळीराजानी पारंपरिक शेती पद्धतीला जर आधुनिकतेचा जोड दिल्यास शेती ही अगदी किफायतशीर ठरत आसल्याचे मत तहसीलदार अर्चना कापसे यांनी व्यक्त केले.त्या तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथे महसूल पंधरवड्या अंतर्गत घेण्यात आलेल्या खरीप हंगाम मका शेती कार्य शाळेत बोलत होत्या.अध्यक्षस्थानी सरपंच सौ रोहिणी सावळे होत्या.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की शेतात काय पिकते हे जितके म्हत्वाचे आहे त्यापेक्षा बाजारात काय विकले जाते हेही तितकेच महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तर यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी बिभीषण धडस यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली.
तर कृषी सहाय्यीका श्रीम एस एस शेळके यांनी सेंद्रिय गट स्थापन करणे,दशपर्णी अर्क,निंबोळी अर्क व जीवामृत याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक गजानन अजेटराव यांनी मका पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी आत्माचे महादेव माळी यांनी pmfme या योजने बद्दल मार्गदर्शन केले.
 यावेळी तहसीलदार अर्चना कापसे,कृषी अधिकारी बिभीषण धडस,मंडल कृषी अधिकारी विशाल पवार,आत्माचे महादेव माळी,सरपंच रोहिणी सावळे,उपसरपंच विजया खिलारे,ग्रामपंचायत सदस्या सिंधुताई पोळ,पल्लवी जाधव,सीमा पाटील,दिपाली पाटीलसह महीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शेवटी सुजाता कुलकर्णी यांनी आभार मानले.