NC Times

NC Times

रोहित पाटील यांच्या कर्तव्य यात्रेचा पहिला मुक्काम घाटनांद्रे विठ्ठलरुक्मिणी मंदिरात,घाटमाथ्याला टेंभूचे दुतर्फा पाणी देणार- मा.रोहित(दादा)पाटील




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- पुर्वीच्या योजने नुसार टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे जलसिंचन योजना ही घाटनांद्रे गावच्या एका बाजूने जात होती.त्यामुळे उर्वरीत दुसरा भाग हा कोरडा व जलसिंचने पासून वंचित रहात होता.पण सुधारित योजने नुसार पळशी (ता खानापूर) येथील निर्मित पंपाद्वारे घाटमाथ्याच्या दुसऱ्या बाजूसही पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते रोहितदादा आर आर (आबा) पाटील यांनी 'कर्तव्य' यात्रे निमित्ताने घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.अध्यक्षस्थानी कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष संजय पाटील (जाखापूरकर) होते.
यावेळी बोलताना रोहित पाटील पुढे की घाटमाथ्यावर टेंभूचे पाणी पुर्ण क्षमतेने वाहील्यास आपसूकच हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन उद्योग निर्मितीस चालना मिळणार आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विकास हाक्के,सरपंच अमर (भाऊ) शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे,कुलदीप शिंदे,वैभव शिंदे,प्रविण शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या अडचणीही सांगितल्या त्याला त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
जनसामान्यांच्या अडचणीचा निपटारा करण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी तासगांव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघतील गावोगावी निघालेल्या ही कर्तव्य यात्रा संपूर्ण तासगांव तालुक्यात फिरुन ती कवठेमहांकाळ तालुक्यात दाखल झाली.तीचा पहिलाच मुक्काम हा घाटनांद्रेत झाला.
ठरल्या नुसार यात्रेच्या कालावधीत युवा नेते रोहितदादा पाटील हेही यात्रेसोबतच मुक्काम करत असतात.त्याप्रमाणे तालुक्यातील त्यांचा पहिला मुक्काम हा घाटनांद्रे येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात केला.