NC Times

NC Times

शिवणी येथील यल्लाप्पा पवार यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
शिवणी (ता कडेगाव) येथील नंदीवाले समाजातील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यल्लाप्पा शेटीबा पवार (वय-७५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा शिक्षक ते मुख्याध्यापक असा ३५ वर्षांचा प्रदीर्घ ज्ञानार्जनाचा प्रवास झाला होता.परिसरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक कामात त्यांचा नेहमीचा सहभाग असे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, दोन मुली सुना,जावाई व नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शिवणी येथील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.