NC Times

NC Times

आटपाडी येथे महसूल पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार सागर ढवळे यांच्या शुभहस्ते संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- एक ऑगस्ट 2024 रोजी  महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या निर्देशानुसार  महसूल पंधरवाडा साजरा करण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आलेले आहे त्यास अनुसरून आज आटपाडी तालुक्यातील महसूल पंधरवडा ची सुरुवात तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत महसूल पंधरवड्याचे उद्घाटन केलेले आहे.
महसूल पंधरवड्यामध्ये खालील प्रमाणे माहिती नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विविध योजनांचे लाभाचे लाभ मिळण्यासाठी त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  १ ऑगस्ट २०२४ -महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा शुभारंभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना    २ ऑगस्ट २०२४- मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना    ऑगस्ट २०२४- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ४ऑगस्ट २०२४- स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ५ ऑगस्ट २०२४-कृषी मार्गदर्शन कार्यक्रम६ ऑगस्ट २०२४- शेती पाऊस व दाखले ७ ऑगस्ट   २०२४- युवा संवाद ८ ऑगस्ट २०२४- महसूल जनसंवाद९ ऑगस्ट २०२४ महसूल ई प्रणाली        १० ऑगस्ट २०२४- सैनिक हो तुमच्यासाठी११ ऑगस्ट २०२४ -आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन १२ ऑगस्ट २०२४- एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा १३ऑगस्ट २०२४- महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण            १४ ऑगस्ट २०२४- महसूल पंधरवडा वार्तालाप  १५ 
ऑगस्ट २०२४  महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण महसूल पंधरवडा सांगता समारंभ                               तरी वरील कार्यक्रमाची लाभ देण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सागर ढवळे यांनी दिली आहे.