NC Times

NC Times

पांडुरंगाच्या यात्रेत गावच्या कन्येची रांगोळी ठरली मुख्य आकर्षण


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(शरद झावरे)-आहिल्यानगर जिल्ह्यातील प्रतीपंढरपुर  म्हणून ओळख असलेल्या श्री. क्षेत्र ताहाराबाद अर्थात थोर संत कवी महिपती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी. याच भूमीत महिपती महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी नवमी पासुन ते अमावस्या पर्यंत पांडुरंगाची फार मोठी यात्रा भरत असते. 
हजारो दिंड्या, लाखो भाविक या पुण्य-भुमीमध्ये हजेरी लावत असतात.
साक्षात पांडुरंग या ठिकाणी पाच दिवस निवास करत असतात. पांडूरंगाचे नामस्मरण आणि हरिनामाच्या जयघोषाने ताहराबाद नागरी अक्षरशः दुमदुमून जाते.
खरंतर या यात्रेत दरवर्षी अनेक आकर्षण ठरत असतात.
या वर्षी मात्र मुख्यआकर्षण ठरले ते म्हणजे याच पुण्य भूमीत जन्मलेली तसेच नांदुरकरांची सून , ताहाराबादकरांची कन्या सौ. अश्विनीताई जाधव झावरे यांनी महिपती महाराजांच्या सभामंडपामध्ये काढलेली अतिशय सुंदर , सुरेख आणि बोलकी अशी पांडुरंगाची रांगोळी. काही तासांचे अथक परिश्रम करून काढलेली ही रांगोळी अनेक भाविकांचे मनमोहून टाकत होती. 
खरंतर वेळात वेळ काढून ही माहेरवाशिन दरवर्षी आपली परंपरा सातत्याने जपताना पहायला मिळत आहे. या वर्षीही अश्याच प्रकारे अश्विनी ताईंनी काढलेल्या या रांगोळीने भाविकांच्या मनावर राज्य केले यात काही शंका नाही.