NC Times

NC Times

शुक्रवारी कवठेमहांकाळ येथे वरद मल्टीपरर्पज हॉलचा उदघाटन सोहळा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वात भव्य दिव्य अश्या देशिंग कॉर्नर,जुना शिंदेवाडी रोड येथील वरद मल्टीपरर्पज हॉलचा उदघाटन सोहळा होणार आहे.यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आण्णासाहेब पाटील व दतात्रय पाटील यांनी केले आहे. 
उद्या शुक्रवार दिनांक २३ रोजी दुपारी १ वाजता तहसीलदार अर्चना कापसे यांच्या हस्ते सदर हॉलचा उदघाटन सोहळा होणार असून,आपलीही उपस्थिती प्रार्थनीय आहे असे त्यांनी कळवले आहे.वरद मल्टीपरर्पज हॉल हा तालुक्यातील सर्वात भव्य व प्रशस्त असा हॉल असून,सुमारे दोन एकरा मध्ये पार्किंगची सोय आहे.तर तीन हजार लोकांची बसण्याची क्षमता आहे.जेवण हॉल मध्ये एकावेळी ८०० लोक बसण्याची क्षमता आहे.सर्व सोयी सुविधांसह सदर हॉल उपलब्ध होणार आहे असे आण्णासाहेब पाटील व दतात्रय पाटील यांनी सांगितले.