NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथे ऊस शेती शाळा वर्ग संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथील कोळेकर- भेंडे वस्तीवर तालुका कृषी अधिकारी बी बी धडस यांच्या मार्गदर्शनाखाली खरिप हंगाम-२०२४ क्रोपसप ऊस शेती शाळेचा दुसरा वर्ग पार पडला.यावेळी मंडल कृषी अधिकारी विशाल पवार यांनी महिलांना ऊस लागवड अंतर्गत सुपर केन नर्सरी पध्दत सशक्त बेणे निवड,क्लोरो,बाविस्टीन व असितोबॅक्टरची जैविक बीजप्रक्रिया तसेच खत व पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. 
      तर कृषी सहाय्यीका श्रीम व्ही जे सुदेवाड यांनी महिलांचा शेतीविषयक निर्णय प्रक्रियेतील सहभाग या विषयावर महिलांशी संवाद साधला.यावेळी पुढील मुद्दे समोर आले.अपुरे ज्ञान,कमी आत्मविश्वास व आवड नसणे.यामुळेच महिला शेतात पुरुषांच्या बरोबरीने काम करुनही त्यांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग कमी असतो.तरी महिलांनी एक पाऊल पुढे टाकत यात सहभाग घेतला पाहिजे.तसेच मकासह इतर विविध पिकांचे किडरोग व व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
      तसेच यावेळी आत्माचे महादेव माळी यांनी उपस्थित महिलांना पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती पीएफएमई या योजने बद्दल महिती दिली. तसेच महिलांनी वैयक्तिक व बचत गटाच्या माध्यमातून एकादा प्रकल्प उभारावा असे सांगुन पीक व्यवस्थापन मधील अडचणींवर मार्गदर्शन केले.यावेळी लघु प्रयोग अंतर्गत निंबोळी अर्क यावर प्रत्येक्षीक करून दाखवले. 
       यावेळी मंडल कृषी अधिकारी व्ही व्ही पवार, कृषी पर्यवेक्षक जी एस कोलगणे,कृषी सहाय्यीका श्रीम व्ही जी सुदेवाड आत्माचे महादेव माळी,बाबासाहेब कोळेकर,तुकाराम कोळेकर, सुरेश थोरात,पांडुरंग थोरात,संजय कोळेकर उपस्थित होते.शेवटी विजया कोळेकर यांनी आभार मानले.