NC Times

NC Times

घाटनांद्रेत आज राणोजी वासकर-महाराज यांच्या उपस्थितीत पारायणाची सांगता


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता वासकर-महाराज फडाचे थेट वारसदार हभप गुरुवर्य राणोजी (मालक) वासकर महाराज यांच्या दृतकाव्य प्रवचनांने होणार आहे.तरी याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन व्यासपीठ चालक हभप गुलाब शिंदे महाराज (घाटनांद्रे) यांनी केले आहे.
        घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) गावापासून पुर्वेला साधारण अडीच किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर प्राचीन,ऐतिहासिक व रम्य अश्या निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वर अर्थात प्रति केदारनाथ मंदिर आहे.येथे दरवर्षी श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमासह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह पार पडतो.
       याही वर्षी सालाबादप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमासह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह पार पडला.त्याची सांगता वासकर-महाराज फडाचे थेट वारसदार हभप गुरुवर्य राणोजी मालक वासकर महाराज यांच्या दृतकाव्य प्रवचनांने त्याचबरोबर महाप्रसाद वाटपाने होणार आहे.