NC Times

NC Times

कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची दखल घ्यावी - दिपाली ताई खोत


नवचैतन्य टाईम्स सातारा  प्रतिनिधी(जय मोरे)- 
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासकीय समिती आढावा बैठक मा. दिपाली ताई खोत यांच्या अध्यक्षतेखाली कराड तहसीलदार ऑफिस येथे पार पडली. यावेळी दिपाली ताई यांनी सांगितले, तळागाळातील कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दखल घ्यावी . अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, बचत गट प्रेरिका, ग्रामसेवक यांनी आपल्या भागात केलेल्या नोंदीची यादी ग्रामपंचायत मार्फत जाहीर करावी, कोणी लाभार्थी वंचित आहे का याची दखल घ्यावी. ज्या भागातील प्रशासन काम करत नाही अश्या संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई व्हावी. मा. तहसीलदार कल्पना ढवळे ताई यांनी सांगितले  संबंधित प्रशासकीय कोणी काम करत नसेल किंवा एखादा भाग वंचित असेल तर कळवावे आपण तिथल्या यंत्रणेला कामाला लावू. यावेळी गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी देखील पूर्ण सहकार्याची भूमिका दाखवली. आढावा मध्ये लाभार्थी अर्ज प्राप्त 98,862 मंजूर अर्ज 95723, पेंडींग अर्ज 92, पडतळणीत 492, ना मंजूर 627, मंजूर अर्ज  1930 अर्ज आहेत. 
यावेळी खटाव आणि कोरेगाव येथील देखील आढावा घेण्यात आला. 
यावेळी नायब तहसीलदार बाळासाहेब राठोड, cdpo पवार ताई, तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ काका,अंगणवाडी सेविका supervisor कुंभार ताई,  अशासकीय सदस्य राहुल ढाने आणि समिती सदस्य उपस्थित होते