NC Times

NC Times

घाटनांद्रेत श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सालाबादप्रमाणे याही वर्षी रावसाहेब रंगराव शिंदे यांच्या घरी श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     अगदी सकाळपासूनच सदर परिसरात भक्तमय वातावरण निर्माण झाले होते.दुपारी चार नंतर गावातील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.तर रात्री बारा वाजता प्रतिमा पूजन करून आरती,पुष्पवृष्टी करण्यात आली.तदनंतर  'श्रीकृष्ण घ्या, गोपाळ द्या' म्हणत श्रीकृष्ण जन्माष्टमी पार पडली.यावेळी उपस्थित महिलानी पाळणा म्हणटला.तर कार्यक्रमाची सांगताही महाप्रसाद वाटपाने करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे संयोजन रंगराव शिंदे,रावसाहेब शिंदे,महेश शिंदे,योगेश शिंदेसह मित्रमंडळीने केले.