NC Times

NC Times

गावकऱ्यांच्या रेट्याने तिसंगीत अखेर स्पीडबेकर


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर(जालिंदर शिंदे):- तिसंगी (ता कवठेमहांकाळ) गावातून जाणाऱ्या दिघंची-हेरवाड या राज्यमार्गावर गावाच्या एसटी स्टॉंड परिसरातील मुख्य चौकातील अगदी वर्दळीच्या ठिकाणी स्पीडबेकर नसल्याने येथे नेहमी लहानमोठे अपघात होत होते.त्यामुळे येथे स्पीडबेकर व्हावा याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कुमार पाटीलसह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.याची दखल घेऊन संबंधित विभागाने तात्काळ स्पीडबेकर बसविल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 
     याबाबत अधिक माहिती अशी की तिसंगी गावातून जाणाऱ्या या दिघंची-हेरवाड या राज्यमार्गावर एसटी स्टॉड परिसरात एका बाजूला संपूर्ण गाव तर दुसऱ्या बाजूला हायस्कूल,जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,सरकारी दवाखाना,पोष्ट,ग्रामपंचायत कार्यालय व बहुंताशी लोकांची शेती आसल्याने येथे नेहमी वर्दळ असते.त्याचबरोबर दिघंची-हेरवाड हा रस्ताही राज्यमार्गात रुपांतरीत झाल्याने वाहने मोठ्या प्रमाणात व भरदाव वेगाने जात आसतात.त्यामुळे येथे छोटे मोठे अपघात हे नित्याचेच बनले होते. 
    हे लक्षात घेऊन याठिकाणी स्पीडबेकर व्हावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कुमार पाटीलसह तानाजी कदम,शिवशांत पोळ,गुलाब पाटील,संभाजी पोळ,रुपेश पोळ,अनिकेत सुतार,सागर शिंदे,आण्णा गुरव यांनी आंदोलनाच इशारा दिला होता.यांच्या या इशार्याने व प्रयत्नातून अखेर या इस्पीत जागी स्पीडबेकर बसविण्यात आले.यामुळे गावकरी व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.