NC Times

NC Times

मा.सुनिल चंदनशिवे तुफान सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड

 
सांगली (प्रतिनिधी)- 
सांगली निगडीखुर्द गावचे सुपुत्र मा.सुनिल चंदनशिवे यांची तुफान सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.ही निवड तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर यांनी जाहीर केली यासाठी अनुमोदन तुफान सेनेच्या राष्र्टीय उपाध्यक्ष सौ सिमा यादव यांनी दिले.यावेळी महाराष्र्ट राज्य अध्यक्ष मा.गोमटेश कोळके यांनी नुतन जिल्हाध्यक्षांचे स्वागत केले.तुफान सेनेच्या पच्छिम महाराष्र्ट अध्यक्षा सौ.पदमा चव्हाण यांनी शुभेच्छा दिला.यावेळी तुफान सेनेचे नुतन सांगली जिल्हाध्यक्ष मा.सुनिल चंदनशिवे म्हणाले तुफान सेनेच्या वाढीसाठी जिल्हाभर कार्यरत असुन,सर्वाना विश्वासात घेवून पुढील निवडी जाहीर होतील लवकरच सांगली जिल्हातील सर्व तालुक्यांच्या पदाधिकार्‍यांची नियोजित बैठक बोलवून तालुका पातळीवरील निवडी जाहीर केल्या जातील तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर यांनी मला जिल्हाभर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे.सर्व पदाधिकार्‍यांचे मनापासुन आभार.यावेळी संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा नितीनभाऊ बडेकर म्हणाले तुफान सेनेचे नुतन सांगली जिल्हाध्यक्ष मा सुनिल चंदनशिवे यांना सामाजिक कार्याची आवड असुन त्यांना तुफान सेनेचे काम करण्याची संधी दिली आहे ते नक्कीच या संधीचे सोने करतील त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा