NC Times

NC Times

घशातील जंतुसंसर्ग थ्रोन इन्फेक्शन

 
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- घशाचा दाह किंवा घशात खवखवणे या आजाराला शास्त्रीय भाषेत  फॅरेनजायटीस असे म्हणतात. म्हणजे जंतुदोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन काही दिवसात आपोआप कमी होते. घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिलला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिलवर पांढरे चट्टे उठणे किंवा त्यावर पस तयार होणे ही फँरिन्जायटिसची कॉमन लक्षणे आहेत. घशाला हा त्रास होत असताना शरीर सुद्धा ह्या इन्फेक्शनची ताप, खोकला, नाक सतत वाहने, अंगदुखी, डोकेदुखी, शिंका, मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणे दाखवत असते. मोठी माणसे हे सगळे काही प्रमाणात सहन करू शकतात. पण लहान मुलांना श्वास घेण्याचा त्रास होतो. तसेच गिळताना त्रास होतो आणि त्यामुळे सतत तोंडातून लाळ गळत असते. असे झाल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे. उपाययोजनाः- (१) घशाचे सूज उतरण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. (२) सुंठ, गवती चहा, जेष्ठमध, हळद, पुदिना यांचा चहा करा लिंबू पिळून प्या.(३) घशाला झालेले इन्फेक्शन घालवण्यासाठी पेरूचे पान अत्यंत उपयुक्त आहे. पेरूच्या पानात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ते चाऊन अथवा उकळून रस प्या.(४) थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे  ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यावरील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करून त्याची वाफ घेतल्यास कशाला आराम पडतो दिवसातून दोन ते तीन वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.(५) घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम काढा प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. काढामध्ये तुळस, लवंग ,आले घातल्यास घशासाठी तो जास्त तो उपयुक्त होतो. असा काढा दिवसातून दोन वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो. (६) दोन मिऱ्याची पुड किंचित हळद, किंचित काथाची पूड मधात घ्यावी.(७) काताची पूड गरम पाण्यात घेतल्यास घसा सुटतो.(८) गरम पाण्यात एक लिंबू रस घ्यावा.(९) लसणाची पाकळी पिठी साखरेत घालून खायची. (१०) मध व ज्येष्ठमध पावडर, व हळद, कोरफडीचा गर आवाजासाठी एकत्र करून चाटावा. दोन वेळा.(११) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चावा. त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.(१२) आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करून प्या.(१३) पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोड्या थोड्या वेळाने प्या.(१४) मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल. (१५) पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनिटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.(१६) लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले कोमट पाणी प्या.(१७) लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले कोमट पाणी प्या.(१८) पुरेसा आराम करा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इन्फेक्शनला प्रतिकार करू शकते. आयुर्वेदिक उपाय योजनाः- (१) खदिरादी वटी एक एक गोळी खडीसाखरे सोबत घेतल्यामुळे घसा सुजणे, पडजीभ सुजणे, ढास लागणे, घशातील खवखव, खरखर, कफ न सुटणे, कसा लाल होणे यात आराम मिळतो.( २) एलादी वटी एक एक चार वेळा घेतल्यास ही लवकर फरक पडतो.(३) पोटातील अन्नरस घशात येऊन जळजळ आग आग होत असेल तर. जेवल्यानंतर अर्धा चमचा अवीपत्तीकर चूर्ण थंड पाण्यात घ्या सोबत. व प्रवाळपंचामृत एक एक गोळी पाव कप दुधात घ्या. अनेक लोकांना घशाच्या जळजळीचा त्रास आहे टेस्ट नॉर्मल येऊन ही कारण कळत नाही की घशात का जळजळ होतेय त्यांनी हे उपाय केल्यास निश्चितच फरक दिसेलच.