NC Times

NC Times

घाटनांद्रे फाट्यावरील घाटकेंच्या 'कोल्हापूरी मिसळ ची ग्राहकांना मोठी भूरळ,ग्राहकांची रीघ '


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :- विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील घाटनांद्रे फाट्यावरील हॉटेल गजानंद मध्ये मिळणार्या घाटकेंच्या 'कोल्हापूरी मिसळीने' ग्राहकांना चांगलीच भूरळ घातली असून,खाव्यांची पावले आपसूकच हॉटेल गजानंदच्या दिशेला वळू लागली आहेत.
आठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या आभ्याळ (ता आथणी) येथील अमर घाटके व सागर घाटके हे बंधू पोट भरण्यासाठी आईवडिलां सोबत घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे आपल्या मामाच्या गावी येऊन स्थाईक झाले व आपल्या वडिलांच्या सोबत पडेल ते काम करु लागले.कष्ट व प्रामाणिकपणा हा नेहमीच अधोरेखित करुन आपले जीवन कंठू लागले.हालाखीचे जीवन हे पाठशिवणीचा खेळ तर खेळतच होते.
  पण नशीब बदलायला व जिवनाला टर्निंग पॉईंट मिळायला एखादी संधीच बास असते व ही संधी एकदा प्रत्येकाला भेटतेच.पण मिळालेल्या या संधीचे सोने करायला फार थोड्या लोकांनाच भाग्य लाभते.की ते जीवनाचे रुपाडेच बदलते.आणी ते भाग्य घाटके बंधूंना लाभले.सुझलॉन कंपनीत साधा सिक्युरिटी गार्ड अर्थात सुरक्षा रक्षकचे काम करता करता अमर घाटके हा त्याच सुझलॉन कंपनीतील छोटीमोठी कामे घेऊ लागला.ही छोटी कामे घेता अनेक मोठ्या कामालाही हात घालू लागला व अशी कामे घेऊ लागला.यातूनच त्याला चार पैसे मिळू लागले.
       घाटके बंधूनी तेच पैसे हॉटेल व्यवसायात गुंतवले व विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गवर घाटनांद्रे फाट्यावर जागा घेऊन तेथे प्रशस्त असे 'हॉटेल गजानंद' उभे केले. त्यामध्ये शाखाहारी,मासाहारी जेवणासह लॉजिंगचीही सोय उपलब्ध केली.पण ग्राहकांच्या पसंतीस उतरली ती त्याच हॉटेल लगत सुरू केलेल्या घाटकेंची 'कोल्हापूरी मिसळच'.या मिसळीसाठी खाव्यांची येथे तोबा गर्दी असते.उतरोउतर या मिसळीची ख्याती वाढतच चालली आहे.आवर्जून बाहेर गावातून कुटुंबासह येथे   'कोल्हापूरी मिसळ' खाण्यासाठी येणार्यांची संख्याही लक्षणीय आहे.व पुन्हा पुन्हा या कोल्हापूरी मिसळीची चव चाखण्याची आस त्यांना लागत आहे.