NC Times

NC Times

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागज शाखेचे चाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-  सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक सांगली शाखा नागज या शाखेचा आज चाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी बँकेचे शाखाधिकारी पाटील नागज गावचे उपसरपंच अनिकेत पाटील, सोसायटी चेअरमन  सुधीर पाटील, शशिकांत पोरे निमज सोसायटी चेअरमन नानासाहेब रुपनर, धर्मराज रुपनवर     आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.  
नागज येथील सोसायटीचे चेअरमन सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात   आली यावेळी शाखाधिकारी पाटील म्हणाले, की नागज शाखा ५ अॉगस्ट १९८५ मध्ये स्थापन झाले असुन  आजअखेर  नागजकर शाखेत 29 कोटीच्या ठेवी असुन तीन कोटीच्या सोन्यावर ठेवी असल्याचे पाटील यांनी सांगितले  बँकेचे यश हे सर्व बँकेचे विश्‍वासू खातेदार व सेवक यांचे आहे. बँकेच्या काम करत असताना प्लॅनिंग व मॅनेजमेंट या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवकांचे व खातेदारांचे बँकिंग पलीकडचे नाते असल्यामुळे खातेदारांना जिल्हा बँकेत व्यवहार करण्यास सोपे जाते. त्यामुळे बॅँकेचा नावलौकिक वाढत आहे.
  बँकेचा रोड मॅप तयार करणे गरजेचे आहे. बँकेच्या सर्व सेवकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यावेळी बँकेच्या कर्मचारी यांनी सर्व मान्यवराचे आभार मानले.