NC Times

NC Times

कवठेमहंकाळ येथे वरद मल्टीपर्पज हाॅलचे उत्साहात उदघाटन सोहळा संपन्न



नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- 
कवठेमहाकांळ तालुक्यातील सर्वात भव्य दिव्य अश्या देशिंग कॉर्नर,जुना शिंदेवाडी रोड येथे 'वरद मल्टीपर्पज' हाॅलचा उदघाटन सोहळा पंचायत समितीच गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर याच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
         आण्णासाहेब पाटील व दत्तात्रय पाटील यांनी उभारलेल्या या भव्य दिव्य अश्या हॉलच्या उदघाटन सोहळास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरद मल्टीपर्पज हाॅलचे खास वैशिष्ट्य म्हणजे या हॉलसाठी दोन एकरा मध्ये पार्किंगची सोय आहे.तर तीन हजार लोकांची एकावेळी बसण्याची क्षमता आहे.त्याचबरोबर एकावेळी जेवणासाठी ८०० लोक बसण्याची क्षमता आहे. 
      अश्या सर्व सोयी सुविधासंह सदर हाॅल उपलब्ध होणार आहे.या वरद मल्टीपर्पज हाॅल उद्घाटन समारंभ सोहळ्यास  कवठेमहाकांळ शिवसेना तालुकाप्रमुख मारुती (भाऊ) पवार,दत्तात्रय पाटील,  उपनगराध्यक्ष बद्रुद्दीन शिरोळकर,अण्णासाहेब पाटील, पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग शाखाचे अभियंता व युवा सेनेचे शरद (भैय्या) पवार,शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ पवार,कवठेमहाकांळ  शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र घाटगे,सागर शेजाळ, अनिल लोंढे,मिलिंद (बापू ) कोरे, श्री महाकाली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील भोसले,माजी उपसरपंच दयानंद सगरे,मोहन कोठावळे,जिल्हा परिषदचे माजी सभापती गजानन कोठावळे,महाकांली हायस्कूलचे चव्हाण सर,महांकाली कंट्रक्शन सप्लायरस ॲण्ड अर्थमूव्हरसचे गजानन शिंदे,रोहन कोठावळे कॉन्ट्ँक्टर,         युवराज कोठावळे, वरद मल्टीपर्पज हॉलचे सचिव प्रकाश हारगे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कवठेमहाकांळ शहरप्रमुख बाळासाहेब पाटील,पांडुरंग पाटील,राहुल गावडे,महेश (भाऊ) पाटीलसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,  प्रशासकीय अधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.