NC Times

NC Times

अंकले येथे विविध कामांचे तम्मनगौडा रवीपाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)-

भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्याहस्ते अंकले येथे रस्त्याच्या काँक्रीटकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. रवीपाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा आज अंकले गावात दाखल झाली. यावेळी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

भाजप जात विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा जत तालुक्यात सुरू आहे. बाज या गावी मुक्काम केल्यानंतर आज ही पदयात्रा अंकले येथे दाखल झाली. अंकले ग्रामपंचायतीच्यावतीने जन सुविधा वित्त आयोग तसेच पंचवीस पंधरा योजनेतून रस्त्याच्या काँक्रीटकरणाची तीन कामे मंजूर झाली आहेत. सदर कामांचे भूमिपूजन तम्मनगौडा रवीपाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जत तालुका ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष शंकर वगरे, बसवसेना अध्यक्ष बसवराज पाटील,
माजी जिल्हा परिषद सदस्या अक्काताई दुधाळ, राजू चौगुले, सरपंच विद्याताई चंदनशिवे, उपसरपंच अरूण सरगर, नारायण नाईक, बसवराज येळगार उपस्थित होते.