NC Times

NC Times

घाटनांद्रेत सुझलॉन फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सुझलॉन फाऊंडेशन पुणे व प्रेरणा फाऊंडेशन येडे निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने घाटनांद्रे येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर परिसरात सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यां कडून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शिक्षक,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     प्रथमतः सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून वृक्षरोपासह रॉली काढली.यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या  'झाडे लावा,झाडे जगवा'  यासारख्या वृक्षारोपणा विषयी प्रबोधनपर घोषणांनी परिसर चांगलाच दणाणून गेला होता.
        तदनंतर सदर वृक्षरॉली श्री यल्लम्मा देवी मंदीर परिसर आली.तेथे सरपंच अमर शिंदे व मुख्याध्यापक बी एस शिंदे यांच्या संयुक्त हस्ते वृक्षारोपणस सुरवात करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी विविध जातीची सुमारे पाचशे एक वृक्षाचे रोपन केले. 
      यावेळी सरपंच अमर शिंदे,मुख्याध्यापक बी एस शिंदे, प्रेरणा फाऊंडेशनचे सचिन यादव, अदिती सिक्युरिटीजचे एसओ संतोष शिंदे,अभियंता राजेश शिंदे,शिक्षक सर्वस्वी साधना धेंडे-कांबळे,प्रकाश वाघमोडे,लक्ष्मण लवटे,जयसिंग बोबडे,भारत काळे,दिलीप खाडे,जयानंद स्वामी,सौ विद्या पाटील,सचिन पाटील,बाळासाहेब रास्ते,साहील पवारसह ग्रामस्थ, विद्यार्थी,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार सिक्युरिटी ऑफीसर संतोष शिंदे यांनी मानले.