NC Times

NC Times

उद्या कोंगनोळी येथे महसूल कॅम्पचे आयोजन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)  :-
 महाराष्ट्र शासनच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे महसूल  पंधरवडा-२०२४ च्या  निमित्तने हिंगणगाव (ता कवठेमहांकाळ) मंडलाच्या वतीने कोगनोळी (ता कवठेमहांकाळ) येथे महसूल कॅम्पचे आयोजन करणेत आले आहे.अशी माहिती तहसीलदार अर्चना कापसे यांनी दिली. 
        सदर कॅम्प मध्ये पुढील कामे ही जागेवरच होणार आहेत.ती याप्रमाणे
१) संजय गांधी,इंदिरा गांधी,वृद्धापकाळ,श्रावणबाळ, योजनेच्या पात्र लाभार्थींना  निवडीचे पत्र देण्यात येणार आहे. 
२) पात्र लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड दिले जाणार आहे. 
३) रेशन कार्ड मधील नावे कमी करणे व वाढविणे या सारखे जागेवर होणार आहे. 
४) फेरफार मंजूर करणे. 
५) सातबारा खाते उतारा वाटप करणे. 
६) ई-पीक पाणी नोंद करणे. 
7) मतदार यादीत नाव नोंद करणे किंवा कमी करणे. 
 या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी गुरुवार दिनांक ८ रोजी हिंगणगाव मंडलातील ग्रामस्थांनी कोंगनोळी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० वाजता सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहनही तहसीलदार अर्चना कापसे यांनी केली आहे.