NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील प्रथमेश शिंदे यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील उच्च सुशिक्षित युवक प्रथमेश प्रभाकर शिंदे (वय- २२) यांचे रविवारी दुपारी पुणे येथे अपघाती निधन झाले.ते घाटनांद्रे गावचे युवा नेते व माजी उपसरपंच प्रभाकर उर्फ पीडीदादा शिंदे यांचे एकुलते एक सुपुत्र होत.ते उमदे,उच्चसुशिक्षीत व हरहुन्नरी स्वभावाचे असल्याने त्यांच्या अश्या अचानक जाण्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,एका बहीण,आजी,चुलते,चुलती, आती व चुलत भाऊ-बहीण आसा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घाटनांद्रे येथील स्मशानभूमीत घेतले आहे.