NC Times

NC Times

तम्मनगौडा रविपाटील यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेत प्रकाश जमदाडे, अमोलसिंह डफळे सहभागी


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ /वार्ताहर(विजय चौगुले)-
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेला डिसीसी बॅंकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे व उमराणीचे संस्थानिक अमोलसिंह डफळे यांनी सहभाग घेऊऊ शुभेच्छा दिल्या.
खोजनवाडी गावात जनकल्याण संवाद पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी व वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. अनेक महिलांनी राखी बांधून तम्मनगौडा रविपाटील यांचे औक्षण केले. 
येथील श्री माधवानंद प्रभू मठात संवाद सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाशराव जमदाडे यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
त्यांच्यासोबत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, माजी नगरसेवक मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सभेत जनकल्याण संवाद यात्रेचे संयोजक निवृत्ती शिंदे सरकार, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार यांची भाषणे झाली.
तम्मनगौडा रवीपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेत उमराणीचे संस्थानिक मा. श्री. अमोलसिंह डफळे हेही सहभागी झाले. अमोलसिंह डफळे हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे तत्कालीन ओएसडी, जत सहकार विभागाचे सहायक निबंधक आहेत अमोल डफळे मेंढीगेरी ते खोजानवाडी दरम्यान पदयात्रेत सहभागी झाले.