NC Times

NC Times

कवठेमहांकाळ-कुंडलापुर वाढीव एसटी बस सुरू


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- विद्यार्थी व प्रवासी यांची वाढती मागणी लक्षात घेता कुंडलापुर-गर्जेवाडी संयुक्त विकास सोसायटीचे चेअरमन दिपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून व युवानेते रोहितदादा आर आर (आबा) पाटील यांच्या विशेष सहकार्याने सकाळी सात वाजता कवठेमहांकाळ-कुंडलापुर ही एसटी बस सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे गावकऱ्यांच्या कडून समाधान व्यक्त केले जात आहे. 
      सकाळी सातच्या दरम्याने कुंडलापुरतुन कवठेमहांकाळकडे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व इतर प्रवाश्यांची संख्या खुप मोठी होती.परंतु घाटनांद्रे कडून कवठेमहांकाळला जाणाऱ्या एसटी बस तिकडूनच फुल्ल होऊन येत असल्याने सदर एसटी बस कुंडलापुरत थांबतच नव्हत्या. त्यामुळे कुंडलापुरतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. 
    ही गोष्ट लक्षात घेता कुंडलापुर-गर्जेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन दिपकराव चव्हाण यांनी युवा नेते रोहितदादा आर आर (आबा) पाटील यांच्या विशेष सहकार्याने कवठेमहांकाळ-कुंडलापुर ही वाढीव बस सुरू करण्यात आली.सदर बसचे स्वागत स्थानिक ग्रामस्थांनी श्रीफळ वाढवून व चालक,वाहक यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी एसटी आगारप्रमुख अमर निकम (साहेब) यांचेही विशेष आभार मान्यात आले. 
       यावेळी ग्रामविकास सोसायटीचे चेअरमन दिपकराव चव्हाण,माजी उपसरपंच पोपटराव मोहीते,जेष्ठ नेते अनिल पाटील,बाबुराव हाक्के,सह विद्यार्थी,प्रवासी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.