NC Times

NC Times

नागज येथील रुपनरवाडी जिल्हा परिषद शाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-नागज येथील रुपनरवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुलांची रुपनरवाडी मध्ये प्रभात फेरी काढली यामध्ये सर्व पालक सहभागी झाले होते, मुला  मुलींनी देश स्वातंत्र्याचा जयघोष करत संपूर्ण रुपनरवाडीचा  परिसर दुमदुमून गेला.
 या कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहण श्रीमती अनुसया बाबासाहेब सरवदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व मुलांनी भाषणे केली, व अंगणवाडीच्या ही काही मुला-मुलींनीही भाषणे केली, त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली,  देशभक्तीपर गीतांचा व विविध गीतांचा सांस्कृतिक  कार्यक्रम ही पार पडला,

 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जिटे सर, कुनुरे  सर, माजी सरपंच धुळाअण्णा रुपनर,सौ छाया रुपनवर ग्रा.प.सदस्या, सौ.जयश्री माने ग्रा.प.सदस्या, माजी ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक रुपनर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत रुपनर, शिक्षण प्रेमी जयसिंग सरवदे, सुनील रुपनर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप रुपनर, ग्रामपंचायत सदस्य आप्पा माने, अंगणवाडीच्या  साबळे मॅडम, पोरे मॅडम, हंकारे मॅडम, व रुपनरवाडीतील सर्व पालक वर्ग माता  भगिनी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.यावेळी आप्पासाहेब माने यांनी मुलांना वह्या व पेनाचे  वाटप केले असुन गावात सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.शेवटी लहान मुलाना खाऊच्या गोळ्या तसेच जिलेबी वाटप करुन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.