NC Times

NC Times

आता एसटी बसचे लोकेशन कळणार घरबसल्या राज्य परिवहन महामंडळाचे ॲप आले, प्रवाशांना मिळणार माहिती


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे)-
स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न नेहमी सतावत असतो.आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे.त्यांना हवी असलेली बस सध्या कुठे आहे,किती वेळात स्थानकावर येणार यासह अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर मिळणार आहेत. 'एमएसआरटीसी'  ॲप'च्या माध्यमातून मोबाइलवर एसटी कुठे थांबली आहे,कधीपर्यंत पोहोचेल याची इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता 'व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम' अर्थात 'एमएसआरटीसी कॉम्प्युटर' हे नवीन ॲप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणेच एसटी महामंडळ प्रवाशांना माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे. 
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे.बस कुठे आहे ते आता त्यांना घरीबसल्या कळणार आहे.सदर अँपमध्ये तिकीट आरक्षण,लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग,महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा सुध्दा दिली आहे.
प्ले स्टोअरवर 'एमएसआरटीसी कॉम्प्युटर' हे ॲप उपलब्ध आहे.मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप प्रवाशांना वापरता येईल.वापरास हे ॲप अगदी सोपे आहे.अपघात झाल्यास मदत मिळणार
महिलांना १०० किंवा १०३ क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा तसेच अपघात झाल्याची माहिती,वैद्यकीय मदतही प्रवाशांना ॲपद्वारे मागवता येणार आहे.बस कुठे आहे हे आधीच कळणार ? बसेसना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) बसविली आहे.याद्वारे बसचे एसटी प्रवाशांना लोकेशन,वेळापत्रक या सर्वांची माहिती प्रवाशांना मिळेल.अभिप्राय,तक्रारी नोंदविण्याची सोय तसेच ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधाही आहे.तक्रारींमध्ये वाहक-चालक,बसस्थिती, बससेवा,ड्रायव्हिंग,मोबाइल ॲप असे वर्गीकरण केले आहे. तक्रारदारास मोबाइल,वाहन क्रमांक नोंदवावा लागेल.