NC Times

NC Times

स्त्रिया नाचवणाऱ्याचे नव्हे तर स्त्रिया वाचवणाऱ्याचा आपण वारसदार- हभप शिवलीलाताई पाटील




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- स्त्रिया नाचवणाऱ्या  नव्हे तर स्त्रीयां वाचवणाऱ्या  छत्रपती शिवरायांचे आपण वारसदार असुन आपल्याकडून कोणतीही आत्याचारीत गोष्ट घडता कामा नये असे प्रत्येकाने वागले पाहिजे असे उदगार महाराष्ट्रातील आघाडीच्या किर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील (बार्शी) यांनी पाचेगाव-बु (ता  सांगोला) येथे काढले.त्या हभप कै आबासो आनंदा घोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने घेण्यात आलेल्या किर्तन सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या की धर्म व परमात्मा हे रक्तातच पाहिजे की जो हभप कै आबासो आनंदा घोडके यांच्या पुढील पिढीनेही जपला.आबासो घोडके हे पट्टीचे किर्तनकार व निष्णात व्यासपीठ चालकही होते.त्यांनी परिसरात वारकरी संप्रदाय रुजवण्याचे मोठे काम केले.त्याचबरोबर ते सधन कुटुंबातील असतानाही आपली मुलगी गरीब वारकर्याच्या घरी दिली हेच आणि इथेच त्यांची खरी संप्रदायाप्रती आसलेली त्यांची निष्ठा दिसून येते आणि मुलगा मच्छिंद्र घोडके हाही त्यांचे हे व्रत कोणत्या तरी रुपाने पुढे नेहतोय ही भाग्याची गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. 
सदर किर्तन सोहळ्यस आटपाडी,खानापूर,सांगोला व कवठेमहांकाळ तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.स्वागत मच्छिंद्र घोडके यांनी तर आभार हभप माऊली घोडके यांनी मानले.