NC Times

NC Times

मुंबई-पुणेकरांनो सावधान अंगावर पावडर टाकून पाकिट करतात गायब

 
हल्लीचे चोर हे पोलिसांपेक्षाही किती तरी पटीने हुशार झाले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण चोरी करण्यासाठी ही मंडळी अशा प्रकारच्या  युक्त्या शोधून काढतात की ज्याबद्दल कधी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. आता या खुजली गँगलाच पाहा ना, ही टोळी लोकांच्या अंगावर खाजेची पावडर टाकते आणि त्यांचं सामान गायब करते.
 दिल्लीमध्ये तर या टोळीनं कहरच माजवला आहे. या खुजली गँगचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहा अन् सावध व्हा, असा प्रकार तुमच्यासोबत घडणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा तुमचं समान सुद्दा हातोहात गायब होईल पण तुम्हाला कळणार नाही.
कशी केली जाते चोरी
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे चोर आधी आपलं टारगेट निवडतात. मग त्या व्यक्तीचा पाठलाग करतात. आणि संधी मिळताच त्याच्या अंगावर खाजेची पावडर टाकतात. अर्थातच अंगाला अचानक खाज सुटल्यामुळे लोकं हैराण होतात. अन् त्यांचं पूर्ण लक्ष अंग खाजवण्याकडे असतं. दरम्यान काही लोक शर्ट वगैरे काढून अंगावर नेमकं काय पडलेय हे तपासण्याचा प्रयत्न करतात. पण अंग खाजवण्याच्या नादात त्याचं आपल्या सामानाकडे दुर्लक्ष होतं. अन् तीच संघी साधून चोर सामान गायब करतात. या चोरीच्या घटना रस्त्यावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत