NC Times

NC Times

बेंदराच्या खरेदीसाठी बळीराजाची लगबग


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- उद्या साजरा केला जाणाऱ्या  महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला कवठेमहांकाळ शहरासह ग्रामीण भागात बेंदूर सणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बळीराजाची मोठी धांदल उठल्याचे चित्र पेठेत दिसत होते. 
शेतकऱ्यांच्या  जिवनात अनन्यसाधारण महत्त्व असणारा सण म्हणजे बेंदूर.या दिवशी बळीराजा बैलासह दावणीला असणाऱ्या सर्वच जनावरांची धुवून व सजावट करून व नैवद्य दाखवून पुजा करतात. 
 यासाठी लागणारे साहित्य रंग, कंडे,वेसन,घुंगरू,बेगड, माळ,शिंगाडे,नवीन दोर यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी बळीराजा बाजारात गर्दी करताना दिसत होते.सततच्या दुष्काळाने व यांत्रिकीकरणाच्या अतिवापरामुळे बैलांची संख्याच रोडावल्याने आपसूकच पुजेसाठीची औपचारिकता पुर्ण करण्यासाठी चिखल मातीच्या बैलांनाही बाजारात मोठी मागणी होतानाचे चित्र दिसत होते.