NC Times

NC Times

" लढा विचारांचा,संस्कृती जोपासण्याचा" एक विचार माझ्या शेतकरी राजाच्या सर्ज्या-राजासाठी


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी-(सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
 !!बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा !! 
"शिंगे रंगवली ,बाशिंगे बांदली,
चढविल्या झूली ऐनदार, 
 राजा प्रधान ,रत्न दिवान," बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 
आज बेंदूर  सणानिमित्त सर्व शेतकर्यांच्या घरी आज बैलांना स्वच्छ धुवून आंघोळ घालून, त्यांचा आवडीचा त्यांना खाऊ म्हणजे "पुरणपोळी "खायला देऊन त्यांना नटूवून  त्यांची मिरवणूक   काढली जाते,
 शिंगे रंगवून  नंतर त्या शिंगांना शेंब्या बांधून, दोन्ही शिंगांच्या मध्ये काळ्या दोऱ्यामध्ये लिंबू ओवून बांधतात. शिंगांना वरच्या बाजूला शेंब्या या  पितळेच्या बांधल्या जातात तर काही ठिकाणी फुगे रिबीन बांधतात.शिंगे रंगवण्यासाठी    'बेगड' लावले जाते. वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या डिजाईनचे बेगड लावले जाते "बैलपोळ्याला" बैलांना सजवण्यासाठी अगोदर पिवळ्या रंगाचे पिवडी लावली जाते,  वरती नंतर मग वेगवेगळ्या रंगाचे छाप उटवले जातात ,वेगवेगळ्या आकृती काढल्या जातात, वेगवेगळी नावे त्यावर त्या बैलांची लिहली जातात. सुंदर, नाजूक, सुबक , निवांत, सर्जा राजा, अशी विविध नावे असणारे बैल व त्यांची नावे, भारत देश हा कृषिप्रधान देश  
 अशा या भारत देशामध्ये विविध सण परंपरा रीती रिवाजानुसार आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते या संस्कृतीच्या दर्शन घडवणारा हा सण .
  परवा काही  शहरातील मुलांना प्रश्न विचारला बेंदूर म्हणजे काय?
बैलपोळ्याला काय करतात,त्यांची उत्तरे मजेशीर होती ,
"बाजारातून मातीची रंगीत बैल आणायची,आणि पूजायची,पुरणपोळी खायची झाला बेंदूर"
आज या पिढीला फक्त मातीचा,आणि चित्रातील च बैल पाहता येतो लोप पावणारा बैल हा प्राणी फक्त शर्यती पुरताच चित्रपट, किंवा सिरियल मध्ये पाहायला मिळणार का?
का डायनोसॉर सारखे हे ही अवशेषा तच अस्तित्वात दिसेल,हा प्रश्न मनाला कावरा-बावरा करतो,व जिवाची घाल-मेल सुरू होते,सासरवाशिण पोर ,कोणा बैलाच्या घुंगराच्या आवाजाने,माहेरच्या राजाची तिला आठवण यायची,
शेतीतील वैरण खाऊन, जगणारा हा वृषभ, जगाचा पोशिंदाचा "पोशिंदा"होय.
ट्रॅक्टर च्या या जमान्यात ही हा माझा सर्ज्या-राजा काळाच्या पडद्याआड तर जाणार नाही ना?
मनात धस्स होते एकीकडे आधुनिकतेकडे झुकलेले मन आणि गावाकडच्या मातीत राबणारे बैल यांच्या ही कष्टाची जाणीव राहिल का या जगाला,
 पूर्वी असे म्हणत बाई,बैल,आणि बळीराजा यांच्या पाचवीला जणूकाही कष्ट च पूजले आहे,
बाई,बैल,बळीराजा यांच्यापैकी एक जरी कष्टात कमी पडेल तर बाई शिवाय घर,बैलाशिवाय शेती,बळीराजाशिवाय पिक कसे होईल?
या दिनी,या बैलपोळ्याला या सर्व त्यांच्या प्रती कृतज्ञता,व्यक्त करू,व आधुनिकतेकडे जरी झुकत असू तरी ,आपल्या या कृषीप्रधान देशात प्रत्येक बळीराजाच्या बैलाप्रती नतमस्तक होऊ,
!! जय जवान जय किसान!!
(ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले )