NC Times

NC Times

खरसुंडी मध्ये एका रात्रीत तीन ठिकाणी चोरी ज्वेलरीच्या दुकानातून साडेचार किलो चांदीचे दागिन्याची चोरी


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-  
खरसुंडी येथे शनिवारी रात्री तीन ठिकाणी चोरी करण्यात आली त्यात प्रामुख्याने खरसुंडी येथील सिद्धनाथ ज्वेलर्स मध्ये साधारण पणे साडेचार किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्याची चोरी करण्यात आली तर सिद्धनाथ हार्डवेअर दुकानातून पंधरा ते वीस हजार रुपये तर प्रसाद जालिंदर जावीर यांच्या पान स्टॉल मधून चार ते पाच हजार रुपयाची रोकड असा तीन लाख 17 हजार पाचशे रुपयाची चोरी करण्यात आली आहे
अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे सदर चोरीच्या बाबत सुरज अशोक गायकवाड वय वर्ष 37 राहणार चिंचाळे तालुका आटपाडी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असुन घटनास्थळी मा.विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विटा मा.प्रकाश गायकवाड पोलिस निरीक्षक आटपाडी पोलीस ठाणे मा. राजीव केंद्रे पोलीस उपनिरीक्षक आटपाडी पोलीस ठाणे यांनी घटनास्थळाची पहाणी केली तर सदर गुन्हाची फिर्याद पोलीस हवालदार 1715 पाटील यांनी कलम 308/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलमा नुसार 331(3)331(4)303(अ)नोंदवीले तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे हे करीत आहेत.