NC Times

NC Times

गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल, आजोबांचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही


असं म्हणतात, कोणाशीही पंगा घ्या पण कधी अस्सल पुणेरी माणसाशी पंगा घेऊ नका, कारण ही मंडळी तुम्हाला कसा धडा शिकवतील सांगता येत नाही. आता हेच प्रकरण पाहा ना, कोणीतरी एका इमारतीच्या गेटसमोर गाडी पार्क केली होती. खरं तर त्या ठिकाणी गाडी पार्क करण्यास सक्त मनाई होती. बहुदा त्यानं नो पार्किंगचा बोर्ड पाहिला नसावा.
 पण काही हरकत नाही… कारण एका पुणेरी आजोबांनी त्याला अशी जन्माची अद्दल घडवली की संपूर्ण आयुष्यात तो कधीच पुन्हा नो पार्किंगमध्ये गाडी लावणार नाही. पुणेरी आजोबांचा हा दणका पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
आजोबांनी असं केलं तरी काय?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती गाडी पार्क करून कुठेतरी गेला आहे. त्यामुळे त्याला पकडून जाब विचारणं काही शक्य नाही. पण आजोबा देखील फार हुशार आहेत, त्यांनी शांतपणे गाडीच्या एका चाकामधील हवा काढली. आता जेव्हा गाडीचा चालक चाक बघेल तेव्हा त्याला एक चाक पंक्चर झाल्याचं लक्षात येईल.
आणि हे चाक का पंक्चर झालं असेल? हे देखील त्याच्या लक्षात येईल अशी अपेक्षा किमान हे आजोबा तरी करत असतील. अन् जर का त्यानं पुन्हा तीच चूक केली तर आजोबा पुन्हा एकदा चाकांमधील हवा काढायला मागेपुढे पाहणार नाहीत.                                                   पुढील लिंक ओपन करुन व्हिडीओ पहा                        https://www.instagram.com/reel/C81UNNAivO5/?igsh=OTl3YmFnNDlkc291